कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला.... चित्रपटसृष्टीलाही याचा मोठा फटका सहन करावा लागला. अद्यापही महाराष्ट्रात सिनेमागृहे केवळ ५० टक्के आसनक्षमतेने सुरू आहेत.... असे असतानाही मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत,असे म्हणायला हरकत नाही...याची सुरूवात करणारा धाडसी चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’.या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी १०० दिवस पूर्ण केले आहेत आणि १५ व्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे. अतिशय कठीण काळात प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून १५ करोडची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट अजूनही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाला आहे.